HW News Marathi
राजकारण

प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतल्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला मारहाण

बीड | भाजपच्या खासदार आणि बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत निवडणुक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पंकजा मुंडे समर्थकांनी काँग्रेसचे पदाधिकारी दादसाहेब मुंडे यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच भाजप कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ते जखमी झाले आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दादासाहेब मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून पूर्वी ओळखले जात होते. परंतु अतर्गत वादांमुळे दादासाहेब पक्षावर नाराज झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांचे कट्टर विरोधक म्हणून दादासाहेब यांना ओळखले जाते.

प्रीतम मुंडे यांची मतदार नोंदणीमध्ये दोन ठिकाणी नावे आहेत. प्रीतम मुंडे यांनी उमेदवारी अर्जात त्याची माहिती दिलेली नसल्याचा दादासाहेब यांचा दावा आहे. तसेच प्रीतम यांच्यावर पोलीस ठाण्यात एका गुन्ह्याची नोंद आहे. या गुन्ह्याबाबतची माहिती त्यांनी उमेदवारी अर्जात दिलेली नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रयागराजमध्ये सर्व भाविक अक्षयवट आणि सरस्वती स्तंभाचे दर्शन करू शकणार !

News Desk

चव्हाण ७०,००० कोटी खर्च केले…पाणी कुठे गायब झाले ?

News Desk

कश्मीरातील जवानांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पुन्हा कमळासमोरचे बटण दाबा !

News Desk