HW News Marathi
देश / विदेश

छुप्या पद्धतीने उत्तर कोरीया बनवतेय जैविक हत्यारं 

वॉशिंग्टन एकीकडे उत्तर कोरियाच्या आण्विक कार्यक्रमामुळं संपूर्ण जग चिंतेत असताना, दुसरीकडं उत्तर कोरिया संहारक जैविक शस्त्रं विकसित करण्याच्या कामी लागला आहे. अमेरिकेतील थिंकटँक असलेल्या बेल्फर सेंटरने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

तसे पाहिले तर संहारक जैविक हत्यारं बनवण्याचा कार्यक्रम उत्तर कोरियानं १९६० च्या दशकातच हाती घेतला होता अशी माहिती समोर आली आहे. उत्तर कोरियाच्या हत्यारांशी संबंधीत एका पथकात काम करणाऱ्यां व्यक्तीकडूनची ही बाब समोर आली आहे. कोरिया युद्धानंतर १९५० ते १९५३ दरम्यान हजारो लोकांचा मृत्यू कॉलरा, टायफस, टायफॉइड आणि देवीचा प्रकोपाने झाला होता. या परिस्थितीला अमेरिकेची जैविक शस्त्रं जबाबदार असल्याचं उत्तर कोरियाच्या सरकारनं म्हटलं होतं. त्यानंतर उत्तर कोरीयाने अशी हत्यारे बनवण्याची मोहीम हातात घेतली. मलेशियात फेब्रुवारीत घातक नर्व्ह एजंट VXमुळे किम जोंग-उन यांचे भाऊ जोंग-नाम यांच्या हत्येनंतर जैविक शस्त्रांच्या प्रयोगाबाबत संशय निर्माण झाला होता. खरं तर हे घातक नर्व्ह एजंट प्योंगयांगच्याच जैव-तांत्रिक संस्थेमधून आला होता असं मानलं जात आहे. इथलं संशोधन केंद्रही उत्तर कोरियाची सेना चालवते. तिथे नेहमीच हुकूमशहा किम देखील येत असतो. २०१५ मध्ये किमने या संशोधन केंद्राला भेट दिली होती. त्यावेळचा त्याचा फोटोही प्रसिद्ध झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतात मोमो चॅलेंजचा दुसरा बळी

Gauri Tilekar

रोहित पवार जरा तुम्ही शरद पवारांच्या खांद्यावरून खाली उतरा !, पडळकरांची टीका

News Desk

अँगेला मार्कल चौथ्यांदा चॅन्सलर

News Desk