HW News Marathi
देश / विदेश

अदाकारी अँकरला तो म्हणाला आंटी

दुबई(वृत्तसंस्था): क्रिकेट सामन्यांदरम्यान क्रीडा वाहिन्यांवर चालणा-या कार्यक्रमांचे संचालन करणा-या महिला अँकर त्यांचे सफाईदार वक्तृत्व आणि सौंदयार्मुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. पण नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणा-या पाकिस्तानच्या युवा क्रिकेटपटूने चक्क एका महिला अँकरचा उल्लेख आंटी असा केला. श्रीलंकेविरुद्ध खेळताना पदार्पणातच शतक फटकावणा-या इमाद उल हक याने एका महिला अँकरने केलेल्या कौतुकारवर हा तिरकस ड्राइव्ह मारला आहे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हकचा नातेवाईक असलेल्या इमाम उल हकने पदार्पणातच शतक ठोकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. पदार्पणातच शतक ठोकल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता. या २१ वर्षीय फलंदाजाचे कौतुक करणा-यांमध्ये अर्थातच महिला चाहत्यांचे प्रमाण लक्षणीय होते. पीटीव्हीची आघाडीची महिला अँकर फझीला साबा इमाम हिचाही इमाम उल हकचे कौतुक करणा-यांमध्ये समावेश होता. फझिलाने इमामचे कौतुक केल्यावर इमामनेही तिला प्रतिसाद देत धन्यवाद फझिला आंटी म्हणत तिचे आभार मानले. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला. अँकरने हा सर्वप्रकार हसण्यावारी घेतला व संबंधित खेळाडुला आंटीकडून शुभेच्छा असा संदेश दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारसाहेब सरकारला मार्गदर्शन करत असतील तर तुमच्या पोटात दुखायचे कारण काय ? राष्ट्रवादीचा भाजपला सवाल

Gauri Tilekar

मतदार नोंदणीची तारीख ३० नोव्हेंबरपर्यंत करण्यात यावी !

News Desk

जेडीयूकडून गुप्तेश्वर पांडे यांना डच्चू, विधानसभेची निवडणूक पांडे लढणार नाहीत

News Desk