मानिला: फिलिपिन्समधील पालवन बेटावर राहणाºया एका मच्छिमाराच्या हाती एक दगड लागला असून त्याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे स्पष्ट झाले आहे. एके दिवशी मासे पकडत असताना अचानक वादळ आले. त्या वादळात तो अडकला. वादळाचा जोर वाढल्याने त्याने जीव वाचवण्यासाठी एका दगडाचा आधार घेतला. त्या दगडाच्या आधारावर जीव मुठीत धरून तो वादळ शमण्याची वाट पाहू लागला. अखेर वादळ थांबले आणि त्या मच्छिमाराचाही जीव वाचला.
ज्या दगडामुळे आपला जीव वाचला त्याला भाग्यवान समजून तो मच्छिमार तो दगड आपल्या घरी घेऊन गेला. सुमारे दहा वर्षे हा दगड त्या मच्छिमाराने आपल्या घरी ठेवला. मात्र एके दिवशी अचानक त्याच्या घराला आग लागली. त्यानंतर एका टुरिस्ट आॅफिसर तेथे आला असता त्याची नजर त्या दगडावर पडली. त्याने या दगडाविषयी मच्छिमाराकडे विचारणा केली. तेव्हा मच्छिमाराने सारी हकीकत सांगितली. मच्छिमाराचे म्हणणे ऐकल्यानंतर हा साधासुधा दगड नसून एक विशाल मोती असल्याचे त्या टुरिस्ट आॅफिसरने सांगितले. ते ऐकताच मच्छिमाराला आश्चयार्चा धक्का बसला. हा मोती विक्रीसाठी ठेवला असता त्याला तब्बल सहा अब्ज ५३ कोटी इतकी प्रचंड किंमत मिळाली. यामुळे मच्छिमार अब्जाधीश झाला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.