HW News Marathi
देश / विदेश

…अशीच मदत किंगफिशर एअरलाईन्सला का केली नाही ?

नवी दिल्ली | भारतीय बँकांचे तब्बल ९००० कोटींचे कर्ज थकवून फरार झालेल्या मद्यसम्राट विजय माल्ल्याने आता जेट एअरवेजप्रकरणी सरकारला प्रश्न विचारला आहे. जेट एअरवेजच्या अडचणीच्या काळात सरकारने त्यांना मदत केली. मग तशीच मदत किंगफिशर एअरलाईन्सला का केली गेली नाही ?, असा सवाल फरार उद्योगपती विजय माल्ल्याने सरकारला केला आहे. विजय माल्ल्याने ट्विट करत सरकारला हा सवाल केला आहे. विजय माल्ल्याने याबाबत एकूण चार ट्विट्स केले आहेत.

“सरकारने जेट एअरवेज आणि किंगफिशर एआरलाईन्ससाठी वेगवेगळा न्याय का केला ?”, असा सवाल माल्ल्याने या ट्विट्समधून केला आहे. “जेट एअरवेजच्या मदतीसाठी सरकारी बँका धावून आल्या, हे पाहून आनंद वाटला. पण किंगफिशर एआरलाईन्सला अडचणीच्या काळात अशी मदत का केली नाही ?”, असे माल्ल्याने म्हटले आहे. यावेळी एनडीए सरकार हे दुटप्पीपणा करत असल्याचा आरोप देखील माल्ल्याने केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींनी पीडित कुटुंबाचा ट्विटरवर फोटो ठेवणं हा गुन्हा आहे का? संजय राऊत म्हणाले….

News Desk

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर गिरीश कर्नाड रडावर

News Desk

सांगलीची सीमा बंद ! बाहेरच्यांना नो एंट्री !

Arati More