HW News Marathi
राजकारण

सुशीलकुमार शिंदेंच्या डोक्यातील चिपची मेमरी फार कमी आहे !

सोलापूर | वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपचा फौरीला सुरुवात झाली आहे.

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या कष्टाने राज्यघटना तयार केली. त्यांचेच नातू जातीयवादी पक्षाशी युती करून त्या राज्यघटनेचा खून करण्यास निघाले आहेत,’ अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी काल (२४ मार्च) केली होती. ‘राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते यांनी संसदीय लोकशाहीऐवजी अध्यक्षीय निवडणुकीचा पुरस्कार केला होता. इंदिरा गांधींना विचारुन हे विधान केल्याचे त्यांनी म्हटले होते. मग घटना बदलण्याचा प्रयत्न कोणी केला?’ असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर उपस्थित शिंदे यांनी प्रतिउत्तर दिले.

तसेच सुशीलकुमार शिंदेंची स्मरणशक्ती फार कमी असल्याचा टोलाही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी लगावला. ‘शिंदेंच्या डोक्यातील चिपची मेमरी फार कमी आहे. मात्र माझ्या डोक्यातील मेमरी चिप जास्त जीबीची आहे. त्यामुळे सर्व गोष्टी माझ्या व्यवस्थित लक्षात राहतात,’ असेही आंबेडकर म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील डांबरी रस्त्यांची आवश्यकता असेल तर चौकशी करु उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

Aprna

तासगाव नगरपालिकेसमोर भर पावसात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे उपोषण

News Desk

युतीसाठी अमित शहांचे ‘मातोश्री’च्या दिशेने एक पाऊल पुढे

News Desk