HW News Marathi
देश / विदेश

एका दिवसात 32 ड्रग माफियांना धाडले यमसदनी

मनिला- फिलीपाईन्स या देशाला ड्रग माफियांनी वेढून टाकले आहे. त्यामुळे तेथील सरकार हैराण असून नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने या माफिया राज विरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. याचंच एक भाग म्हणून केवळ 24 तासांत 32 ड्रग्ज माफियांना ठार करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
66 ठिकाणी पोलिसांनी ग्राहक बनून ड्रग्ज खरेदी करण्याची ‘बाय बर्स्ट’ योजना आखली होती. त्यात 20 ठिकाणी ‘बाय बर्स्ट’ ऑपरेशनदरम्यान तर 14 ठिकाणी शोधमोहिमेदरम्यान चकमक उडाल्याची माहिती पोलीस अधिका-याने दिली. त्यात एकूण 32 ड्रग्ज माफियांना ठार करण्यात आलं.
फिलीपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुर्तेते यांनी ड्रग माफियांविरोधात छेडलेल्या युद्धामुळे त्यांच्यावर जगभरातून टीका होत आहे. त्यांनी जून 2016 मध्ये अध्यक्ष पदाची सूत्रे घेतल्यानंतर आतापर्यंत नऊ हजारांहून अधिक ड्रग्ज माफियांना मारून टाकण्यात आलं आहे.
मंगळवारी फिलीपाईन्समध्ये ड्रग्ज माफियांविरोधात करण्यात आलेली कारवाई आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असून एका रात्रीत इतक्या जणांना ठार करण्यात आल्याची ही पहिलीच वेळ आहे. 32 जणांना ठार करण्यात आलं असून 107 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

१२ लाख कोटींच्या नवीन नोटा चलनात- अर्थ मंत्री , अरुण जेटली

News Desk

राजस्थानमध्ये मोठा राजकीय भूकंप! काँग्रेसच्या ८२ आमदारांनी दिला राजीनामा

Darrell Miranda

बजरंग दलाचे माजी नेते बाबू बजरंगी यांची जन्मठेप कायम

News Desk
मुंबई

तर उरलेल्या तुरीचे शेतकऱ्यांनी पकोडे तळायचे का? : विखे पाटील

swarit

मुंबई | राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना एकरी सरासरी 8 ते 10 क्विंटल उत्पादन झाले असताना सरकार त्यातील मोजकीच तूर खरेदी करणार असेल तर उरलेल्या तुरीचे पीठ करून पकोडे तळायचे का, अशी संतप्त विचारणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

तूर खरेदीबाबत एकरी मर्यादा घालणाऱ्या परिपत्रकावरून सरकारवर टीकेची झोड उठवताना विखे पाटील म्हणाले की, एक तर मुळात शासकीय तूर खरेदीसाठी उशीर झाला आहे. त्यातच सरकारने शासकीय तूर खरेदीसाठी घातलेली जिल्हानिहाय एकरी मर्यादा शेतकरी विरोधी असून, यासंदर्भातील परिपत्रक तातडीने मागे घेतले पाहिजे.

या परिपत्रकानुसार खरेदी झाली तर अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याच्या एकूण उत्पादनाच्या एक तृतियांश तूर देखील हमीभावाने खरेदी होणार नाही. काहीही झाले तरी आम्ही सरकारला संपूर्ण तूर खरेदी करायला भाग पाडू. सरकार हे अन्यायकारक परिपत्रक मागे घेणार नसेल तर काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून सरकारला सळो की पळो करून सोडेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मंगळवारी यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याची माहिती देखील विरोधी पक्षनेत्यांनी दिली.

Related posts

अंधेरीतील कामगार रुग्णालयाला आग

News Desk

बाप्पाच्या दर्शनापासून भाविक पाच दिवस वंचित

News Desk

लोअर परळ येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी तब्बल ११ तासांचा मेगाब्लॉक

News Desk