नवी दिल्ली | भाजपने लोकसभा उमेदवारांची चौथी यादी काल (२३ मार्च) जाहीर केली. भाजपने ४८ लोकसभा उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली. या यादीत ६ राज्यांच्या ४६ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. मध्य प्रदेश १५, गुजरात १५, झारखंड १०, हिमाचल प्रदेश ४ तर कर्नाटक आणि गोवामधून प्रत्येकी २-२ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील एकाही जागेचा उल्लेख नाही.
JP Nadda, BJP: We will declare 46 seats today. Shripad Naik to contest from North Goa, Narendra Singh Tomar from Morena, Janardan Mishra from Reva, Rakesh Singh from Jabalpur. pic.twitter.com/U1L3Af6w90
— ANI (@ANI) March 23, 2019
चौथ्या यादीत उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक आणि दक्षिण गोव्यातून नरेंद्र साईवलीकर या दोघांना उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना मोरेना तर अनुराग ठाकूर यांना हमीरपूर मतदार संघातून तिकीट देण्यात आले आहे. जयंत सिन्हा यांना हझारीबाग, जनार्दन मिश्रा यांना रेवा, राकेश सिंग यांना जबलपूर, सुरेश कश्यप यांना शिमला, किशन कपूर यांना कांग्रा तर निशिकांत दुबे यांना गोड्डा यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Bharatiya Janata Party (BJP) releases another list of candidates for the upcoming Lok Sabha elections. Candidates for the legislative assembly (3 each for Gujarat and Goa) bye-polls also announced. pic.twitter.com/GUQRX23Fto
— ANI (@ANI) March 23, 2019
भाजपच्या चौथ्या यादी या सहा राज्यांचा समावेश
- मध्य प्रदेश – १५
- गुजरात – १५
- झारखंड – १०
- हिमाचल प्रदेश – ४
- कर्नाटक – २
- गोवा – २
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.