HW News Marathi
राजकारण

आज युतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार

कोल्हापूर | लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. युतीच्या प्रचाराचा शुभारंभ आज (२४ मार्च) कोल्हापुराती तपोवन मैदानावर सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राहणार आहेत. या मैदानात जवळपास २ लाख नागरिक बसतील अशी सोय करण्यात आली आहे.

सभेच्या पार्श्वभूमीवर काल (२३ मार्च) आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सभेच्या मैदानाची पाहणी केली आहे. युतीची ही पहिल सभा असून या सभेत शिवसेना-भाजप युतीचे दिग्गज नेत्यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सभेत उपस्थित राहणार आहेत. या प्रचार सभेसाठी उद्धव ठाकरे मुंबईतून दुपारी २ वाजता कोल्हापूरसाठी रवाना होणार आहे. कोल्हापूरच्या ठाकरे अंबाबाई मंदिरामध्ये दर्शन घेऊन सभेसाठी जाणार आहे.

युतीच्या सभेसाठी गर्दीच्या कारणाने जर कार्यकर्त्यांना सभेपर्यंत पोहचता आले नाही तर त्यांच्यासाठी शहरातील प्रमुख चौकात १० स्क्रीन्स लावण्यात आल्या आहेत. ही सभा ‘न भूतो न भविष्यति’ सभा करुन कोल्हापुरातील शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातील पहिली सभा २८ तारखेला वर्ध्यात होणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : प्रकाश आंबेडकरांच्या जातीवादाविरुद्धच्या संघर्षाला काय अर्थ उरतो ?

News Desk

6 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून अजित पवारांच्या टोल्याला देवेंद्र फडणवीसांनी दिला गुरुमंत्री

Aprna

गंभीरने मुख्यमंत्री केजरीवालांसह ३ जणांवर ठोकला मानहानीचा दावा

News Desk