HW News Marathi
देश / विदेश

अमेरिकेने रोखली पाकिस्तानची रसद

वृत्तसंस्थाः दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांच्या यादीत पाकिस्तानचे नाव टाकल्यानंतर अमेरिकेने पाकला आणखी एक जोरदार झटका दिला आहे. पाकला अमेरिकेकडून दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी आर्थिक मदत केली जात होती. ही रक्कम रोखण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. तब्बल ३५० दशलक्ष डॉलर्स पाकला मिळणे अपेक्षित होते त्यातली ‘दमडी’ही पाकला आता मिळणार नाही.

हक्कानी नेटवर्कविरोधात पाकने प्रभावी कारवाई केलेली नाही, असा अहवाल संरक्षण सचिव जेम्स मॅटिस यांनी अमेरिकी काँग्रेसला दिला होता. त्याआधारेच पाकिस्तानला दिली जाणारी मदत रोखण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

पेंटागॉनचे प्रवक्ते एडम स्टम्प यांनी याबाबत अधिक स्पष्टीकरण दिलं. राष्ट्रीय सुरक्षा प्राधिकार अधिनियमानुसार आर्थिक वर्ष २०१६साठीचा उर्वरित निधी पाक सरकारला दिला जाऊ शकत नाही, असे स्टम्प यांनी सांगितले. हक्कानी नेटवर्कवरील कारवाईबाबत समाधान झालेले नसल्याने हे पाऊल उचलण्यात येत असल्याचेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुंछ भागात जवानासह पत्नीचा मृत्यू

News Desk

वेतन वाढीची मागणी अपुर्ण राहिल्याने आजपासून ३ दिवस बॅंकांचा संप

swarit

नवे केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर आणि लडाख यांच्या बद्दलेल्या सीमारेषाचा नकाशा

News Desk