नवी दिल्ली | “जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ला हा केवळ मतांसाठी घडवून आणलेला हल्ला होता. सरकार बदलल्यानंतर या प्रकाराची चौकशी होईल. बड्या-बड्या व्यक्ती यात अडकतील”, असे धक्कादायक वक्तव्य समाजवादी पार्टीचे महासचिव राम गोपाल यादव यांनी केले होते. दरम्यान, या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यादव यांच्यावर सडकून टीका केली आहे. “यादव यांचे वक्तव्य हे गलिच्छ राजकारणाचे उदाहरण आहे”, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
UP CM Yogi Adityanath on Ram Gopal Yadav's (SP leader) statement: Ramgopal Yadav ka bayan ghatiya rajniti ka bhadda udharan hai, unhe CRPF ke jawano ki shahadat pe prashn khada karne, aur desh ke jawano ka manobal todne wale is bayan ke liye, janata se maafi maangni chahiye. pic.twitter.com/hC2lbg48yU
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 21, 2019
“राम गोपाल यादव यांचे वक्तव्य हे गलिच्छ राजकारणाचे उदाहरण आहे. त्यांनी या शहीद सीआरपीएफ जवानांवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आणि जवानांचे खच्चीकरण करणाऱ्या त्यांच्या वक्तव्यासाठी देशातील जनतेची माफी मागावी”, अशी मागणी देखील योगी आदित्यनाथ यांनी यावेळी केली आहे.
“सरकारने केवळ मतांसाठी जवानांना मारले आहे. हेतुपूर्वक जवानांना सध्या बसमधून पाठवण्यात आले होते. मी आता सध्या याबाबत काही सांगू शकत नाही. मात्र, जेव्हा सत्तापालट होईल तेव्हा दुसरे सरकार याबाबतची चौकशी करेल. तेव्हा या प्रकरणात बडेबडे लोक अडकतील”, असा दावा राम गोपाल यादव यांनी केला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.