मुंबई | “पार्थच्या पहिल्या भाषणाची खिल्ली उडवण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. पार्थ म्हणजे लंबे रेस का घोडा है”, असा विश्वास काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर पार्थ पवार यांनी पहिली प्रचारसभा घेतली. मात्र, नेटकऱ्यांनी पार्थ यांच्या पहिल्या भाषणाची खिल्ली उडवली. दरम्यान, नितेश राणे यांनी पार्थ यांची बाजू सावरून घेतली आहे.
पार्थ पवार च्या पहिल्या भाषणवार खिल्ली उडवण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे..
पहिले भाषण आणि मोठी गर्दी..
धाडस लागतो!
लंबे रेस का घोडा है..याद रखना!!— nitesh rane (@NiteshNRane) March 19, 2019
“पार्थ पवारच्या पहिल्या भाषणवार खिल्ली उडवण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. पहिले भाषण आणि मोठी गर्दी. धाडस लागते ! लंबी रेस का घोडा है..याद रखना !!”, असे म्हणत नितेश राणे यांनी पार्थ पवार यांची बाजू सावरून घेत त्यांच्याबाबत विश्वास व्यक्त केला आहे. पार्थ पवार हे त्यांच्या पहिल्या भाषणादरम्यान प्रचंड घाबरलेले दिसत होते. त्यामुळे सोशल मीडियावर पार्थ यांच्या भाषाशैलीवरून त्यांची प्रचंड खिल्ली उडविण्यात आली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.