HW News Marathi
राजकारण

गोव्यात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसने घेतली राज्यपालांची भेट

पणजी | गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी (१७ मार्च) संध्याकाळी ६.३० च्या सुमारास दोनापावला येथील निवासस्थानी अखेरचा श्‍वास घेतला. यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री पदाचा पेच निर्माण झाला आहे. गोव्याच्या विरोधी पक्ष काँग्रेसनेन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. यासाठी दोनापावला येथील राजभवनमध्ये राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने त्यांना पत्र सादर केले आहे.

काँग्रेसच्या शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात काँग्रेस आमदार तसेच पदाधिकार्‍यांचा समावेश होता. पर्रीकर यांच्या निधनानंतर काँग्रेसने रविवारी (१७ मार्च) रात्री उशीरा सरकार स्थापनेचा दावा करणारे पत्र राज्यापाल सिन्हा यांना पाठवले होते. परंतु राज्यपालांनी काँग्रेसला भेटण्यासाठी वेळ दिला नव्हता. त्यामुळे काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळाने आज (१८ मार्च) दुपारी १२.३० वाजच्याच्या सुमारास राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अन् शरद पवार म्हणतात, अभी तो मै जवान हूं !

News Desk

मुख्यमंत्री व पंतप्रधानांच्या सुरक्षेत वाढ करा

News Desk

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार ?

News Desk