HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

मुंबई | १७व्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी आज (१५ मार्च) यादी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीने ५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत बहुचर्चित अशा मावळ मतदारसंघातून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार तर शिरूर मतदारसंघातून अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

माढा, अहमदनगर आणि गोंदिया या मतदार संघातील उमदेवारांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहे. राष्ट्रवादीने काल (१४ मार्च) राष्ट्रवादीने पहिल यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीमध्ये महाराष्ट्रातील १० आणि लक्षद्वीपमधील १ अशा ११ नावांची घोषणा करण्यात आली होती.

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर

  • धनराज हरिभाऊ महाले – दिंडोरी
  • समीर भुजबळ – नाशिक
  • डॉ. अमोल कोल्हे – शिरूर
  • बजरंग सोनावणे – बीड
  • पार्थ अजित पवार – मावळ

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Chhattisgarh Assembly Elections 2018 : ७० टक्के जनतेने केले मतदान

News Desk

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर

News Desk

नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ED च्या ताब्यात

Aprna