HW News Marathi
राजकारण

दिल्ली राज्य मनोज तिवारींच्या बापाचे आहे का ?, केजरीवालांची जीभ घसरली

नवी दिल्ली | “दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळण्यापासून रोखणारे मनोज तिवारी आहेत तरी कोण ? दिल्ली राज्य मनोज तिवारींच्या बापाचे आहे का ? दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी मनोज तिवारींच्या बापाने आंदोलन केलेले नाही”, असे वादग्रस्त वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘आप’ने मांडलेल्या दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्याच्या मुद्द्यामुळे दिल्लीचे राजकारण तापले आहे. त्यातच आता केजरीवाल यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

मनोज तिवारी यांनी काहीच दिवसांपूर्वी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याबाबत वक्तव्य केले होते. “दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात येऊ नये. तसे झाल्यास देशातील संघराज्य पद्धतीला धोका निर्माण होईल”, असे मनोज तिवारी यांनी म्हटले होते. “गुजरात, आंध्रप्रदेश, बिहार या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यासाठी आंदोलने केली आहेत. त्या राज्यांनाही कमकुवत करणार का ? दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यापासून रोखणारे मनोज तिवारी आहे तरी कोण ? दिल्ली राज्य हे मनोज तिवारींच्या बापाचे आहे का ? दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी मनोज तिवारी यांच्या बापाने आंदोलन केलेले नाही”, असे वादग्रस्त वक्तव्य केजरीवाल यांनी केले आहे.

पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील ७ जागा जिंकल्या तर दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन भाजपच्या २०१४ च्या घोषणापत्रात देण्यात आले होते. दिल्लीतील जाहीर सभेत अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या या घोषणापत्राची होळी केली. भाजप आणि पंतप्रधान मोदींनी दिल्लीच्या लोकांची फसवणूक केल्याचा आरोपही यावेळी केजरीवाल यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुलवामासारखी घटना घडली नाही तर महाराष्ट्रमध्ये बदल नक्की घडेल !

News Desk

शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ कधी मिळणार ?

News Desk

BharatBandh | भारत बंदला पुण्यात हिंसक वळण

News Desk