मुंबई | “काँग्रेसने कायमच जातीयवादी संस्कृतीला खतपाणी घातले आहे. त्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस पक्ष विसर्जित करण्यात यावा ही राष्ट्रपिता महात्मा गांधींचीच इच्छा होती”, असे ट्विट करत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. इंग्रजांच्या काळात आकारण्यात आलेल्या मिठावरील कराविरोधात महात्मा गांधीजींनी काढलेल्या दांडी यात्रेला आज ८९ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधींना अभिवादन करत काँग्रेसवर निशाणा साधला. “काँग्रेस आणि भ्रष्टाचार हे एकमेकांचे पर्याय ठरू लागले आहेत”, असा टोलाही यावेळी पंतप्रधान मोदींनी लगावला आहे.
Tributes to Bapu and all those who marched with him to Dandi in pursuit of justice and equality.
Sharing a few thoughts on the Dandi March, the ideals of Bapu and his disdain for the Congress culture in my blog.https://t.co/QVuDNCZoXL
— Narendra Modi (@narendramodi) March 12, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दांडी यात्रेच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्ताने एक ब्लॉग लिहिला आहे. “काँग्रेसला लोकशाहीच्या मूल्यांबद्दल कोणत्याही प्रकारचा आदर नाही. महात्मा गांधीजींनी काँग्रेसची ही प्रवृत्ती चांगलीच ओळखली होती. त्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस पक्ष विसर्जित करण्यात यावा, अशी गांधीजींची इच्छा होती. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या सर्व बुद्धिजीवींचे आणि नेत्यांचे हे कर्तव्य आहे कि त्यांनी भारताच्या सन्मानाचे रक्षण करावे, असे महात्मा गांधी यांनी १९४७ सालीच सांगितले होते”, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.