HW News Marathi
देश / विदेश

रशियन सरकारवर टीका केली तर होणार तुरुंगवास

नवी दिल्ली | रशियाच्या सरकारने आता एक अत्यंत धक्कादायक कायदा केला आहे. रशियातील या नव्या कायद्यानुसार, रशियात यापुढे जर सोशल मीडियाच्या माध्यमातून देश, सरकार, सरकारी अधिकारी, संसद, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यावर टीका करण्यात आली तर संबंधित व्यक्तीला मोठा दंड किंवा तुरुंगवास भोगावा लागू शकतो. रशियन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात युनायटेड रशिया पार्टीचे बहुमत असल्याने या विधेयकाचे कायद्यात रुपांतर करणे सोपे झाले. दरम्यान, रशियाच्या या नव्या कायद्याला रशियन जनतेकडून प्रचंड विरोध आणि टीका होत आहे.

सरकार, देश, समाज, सरकारी अधिकारी, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यावर टीका केल्यास संबंधित व्यक्तीला १,००,००० रुबल्स म्हणजेच १ लाख ६ हजार ३१५ रुपये दंड भरावा लागणार आहे. याशिवाय तोच गुन्हा पुन्हा केल्यास दंडाची रक्कम दुप्पट होणार आहे. रशियाच्या नव्या कायद्यानुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून रशियाच्या सरकारवर केली जाणारी टीका ही अपमानास्पद समजली जाणार आहे. सरकारला जर एखादी बातमी फेक वाटली तर संबंधित लोकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फेसबुकवर एक्स गर्लफ्रेंडसोबत व्हिडीओ चॅट करतना तरूणांने केली आत्महत्या

News Desk

भारतीय लष्कराला तोफांच्या रूपात दिवाळी भेट

swarit

WHO ने केले कोरोनाच्या प्रसंगी भारत करत असलेल्या कामगिरीचे कौतुक

swarit