HW News Marathi
राजकारण

मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे शिवसेनेच्या वाटेवर

मुंबई | मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे. सोनावणे हे त्यांच्या समर्थकांसह मातोश्रीवर जाणार आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जुन्नर या मतदारसंघातून सोनावणे एकमेव उमेदवार निवडून आले होते.

शरद हे त्यांच्या समर्थकांसह मातोश्रीवर दाखल झाले असून ते आज (५ मार्च) शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु सोनावणे जर सनेत सामील होण्याची माहिती मिळताच जुन्नरमधील शिवसैनिकांनी त्यांना तीव्र विरोध केला आहे. बाहेरच्या उमेदवार शिवसैनिक स्वीकारणार नसल्याची भूमिका जुन्नर तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. आमची भूमिका ऐकून न घेता शरद सोनावणे यांना उमेदवारी दिली तर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आपापल्या पदाचा सामूहिक राजीनामा देतील, असा इशाराही दिल्याची चर्चा आहे.

त्यामुळे मनसेच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. यापूर्वी महाआघाडीत मनसेला सामावून घेण्यास काँग्रेस स्पष्ट नकार कळविला होता. काँग्रेस आणि मनसेसोबत वैचारिक मतभेत असल्यामुळे अशा पक्षांना महाआघाडीत सामील करून घेणे अवघड असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले होते. समविचार धारेच्या पक्षांनी एकत्र येवून भाजपचा लोकसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी महाआघाडीत मनसेचा समावेश करण्यात यासाठी अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या निवास्थानी जावून भेट घेतली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीत ‘आप’ची सर्व मते काँग्रेसला गेल्याचा केजरीवालांचा दावा

News Desk

दोन गुजराती चोर देशाला मूर्ख बनवत आहेत, भाजपच्याच ज्येष्ठ नेत्याची टीका अन् निलंबन

News Desk

मी निवडणूक लढायला तयार आहे !

News Desk