HW News Marathi
मुंबई

पालघरच्या चांदीत रेती बंदरावर जिलेटीनसह स्फोटके सापडली

पारोळ | पालघर जिल्ह्यातील चांदीत रेती बंदरावर रविवारी (४ मार्च) पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने कारवाई करत २४ जिलेटीनच्या कांड्या आणि स्फोटक पदार्थ सापडले आहे. चांदीप रेती बंदरामध्ये सेक्शन पंपातून अवैध रेती उपसा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली होती. यावेळी पोलिसांनी रेती भरलेल्या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

तानसा नदीत पाण्याखाली ही स्फोटकांचा वापर करून पसरलेली रेती सेक्शन मशीनने काठावर जमा केली जाते. या स्फोटकाचा वापर पाण्याखाली रेती सैल करण्यासाठी होत असल्याची माहिती खास सूत्रांनी दिली आहे. तर या कारवाईत आरोपी हाती न लागल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BMC Election 2022: 53 ओबीसींसाठी आरक्षित वॉर्ड कोणते?, शिवसेनेच्या दिग्गजांचे वॉर्ड आरक्षित

Manasi Devkar

मुंबई, उपनगर, वसईसह पालघरमध्ये जोरदार पाऊस

News Desk

…धाडसी प्रवाशानं एकाला वाचवलं –

News Desk