HW News Marathi
मुंबई

नवनीत राणांच्या बनावट जात प्रमाणप्रत पडतळणी प्रकरणाची सुनावणी 28 डिसेंबरला होणार

मुंबई | खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या बनावट जात प्रमाणप्रत पडतळणी प्रकरणीची सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. या प्रकरणाची सुनावणी 28 डिसेंबर रोजी होणार आहे. या प्रकरणी शिवडी दंडाधिकारी न्यायालयात आज (22 डिसेंबर) सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान बनावट जात प्रमाणपत्र पडताळणीची सुनावणी पुढे ढकलली.

दरम्यान, नवनीत राणा आणि त्यांचे वडिलांना मुंबई सत्र न्यायालयाने बुधवारी (21 डिसेंबर) सुनाणीत दोषमुक्ततेसाठी केलेल्या अर्ज फेटाळला होता. तसेच शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटवरही स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला होता. या सुनावणीत नवनीत राणा आणि त्यांचे वडिल यांना शिवडी दंडाधिकारी न्यायालयात हजर राहावे लागेल, असे आदेशही मुंबई सत्र न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीत दिली होते. नवनीत राणा आणि त्यांचे वडिलांविरोधात शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने ऑक्टोबर महिन्यात दोन वेळा अजामीनपात्र जारी केले होते.

तसेच नवनीत राणा यांनी 2019च्या लोकसभा निवडणूक ज्या जागेवरून लढविली होती. ती जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित होती.   त्या जातीतील नसूनही नवनीत राणांनी जातीचा मिळवून निवडणूक लढविली आणि त्या विजयी देखील झाल्या. नवनीत राणांनी त्यांच्या शाळा सोडल्याचा खोटा दाखल्याच्या आधारे त्यांनी जात प्रमाणपत्र मिळविल्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या वडिलांवर मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Gauri Tilekar

आज दहावीचा निकाल

News Desk

किंग्ज सर्कलजवळील पुलाखाली अडकलेला कंटेनर हटवण्यात यश

News Desk