HW News Marathi
मुंबई

परळ टर्मिनसवर तांत्रिक बिघाड, ‘मरे’ची वाहतूक विस्कळीत

मुंबई | परळ टर्मिनसवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रविवारी (३ मार्च) परळ टर्मिनसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. लोकार्पणनंतरच्या दुसऱ्याच दिवशी नव्या परळ टर्मिनसवर तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. तर वडाळा डेपोकडे तांत्रिक बिघाड झाल्याने मोनोची वाहतूक बंद झाली. दुपारी 1 च्या सुमारास मोनो सेवा बंद झाली. गेल्या अर्ध्या तासापासून मोनो सेवा बंद झाली आहे. प्रवाशांना तातडीने उतरविण्यात आले.

कॉर्पोरेट हबसाठी ओळखले जाणाऱ्या परळच्या रेल्वे स्थानकाचे रूपांतर आता अखेर ‘परळ टर्मिनस’मध्ये करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रविवारी (३ मार्च) मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते डोंबिवली या १५ डब्यांच्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्यात आले आहे. परळ टर्मिनस हे पश्चिम रेल्वे मार्गाला जोडत असल्याने प्रवाशांना येथून प्रवास करणे सोपे होणार आहे.

नवीन रेल्वे रूळ टाकून कल्याणकडे जाणारी नवीन मार्गिका तयार करण्यात असून फलाट क्रमांक २ अ ही टर्मिनस मार्गिका आणि फलाट क्रमांक ३ चे रुंदीकरण करण्यात आले आहे. १२ मीटर रुंदीचा पूर्व-पश्चिम जोडणारा पादचारी पूल, सरकते जिने इ. सुविधा उपलब्ध आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दादरमध्ये कार्तिकी एकादशी निमित्त भव्य दिंडी सोहळा संपन्न

News Desk

वाल्मिकी नगरमधील झोपड्यांच्या सर्वेक्षण काम सुरू करा- राज्यमंत्री रविंद्र वायकर

News Desk

परेने फुकट्या प्रवाशांकडून केले ८ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल

News Desk