नवी दिल्ली | पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान तब्बल ६० तासांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर आज (१ मार्च) मायभूमीत सुखरूप परतले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी (२८ फेब्रुवारी) पाकिस्तानच्या संसदेत याबाबतची घोषणा केली होती. त्याप्रमाणे पाकिस्तानने कमांडर अभिनंदन यांची बिनशर्त मुक्तता केली आहे. थोड्याच वेळापूर्वी कमांडर अभिनंदन हे वाघा बॉर्डरवर दाखल झाले. पाकिस्तानच्या ‘बीटिंग द रिट्रीट’नंतर कमांडर अभिनंदन यांना भारताकडे सोपविण्यात आले आहे. संपूर्ण देश कमांडर अभिनंदन यांच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. त्यामुळे अभिनंदन यांचे मायभूमीत सुखरूप परतणे हा संपूर्ण भारतासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. दरम्यान, आता भारतात परतल्यानंतर प्रथम दिल्लीत अभिनंदन यांची वैद्यकीय तपासणी होईल. आता थोड्याच वेळात भारतीय वायू सेनेचे अधिकारी माध्यमांशी संवाद साधणार आहेत. कमांडर अभिनंदन वर्धमान यांना इस्मालाबादहून लाहोरमार्गे वाघा बॉर्डरवर आणले गेले असून अभिनंदन यांना आता अमृतसरमार्गे दिल्लीला घेऊन जाण्यात येणार आहे.
IAF Wing Commander #AbhinandanVarthaman crosses border to enter India. pic.twitter.com/wAIcwCbkKZ
— ANI (@ANI) March 1, 2019
IAF Wing Commander #AbhinandanVarthaman at Wagah-Attari border, to cross border soon to enter India. pic.twitter.com/a1hVjwroVw
— ANI (@ANI) March 1, 2019
IAF Wing Commander #AbhinandanVarthaman at Wagah-Attari border pic.twitter.com/WGz0LaNvX3
— ANI (@ANI) March 1, 2019
IAF Wing Commander #AbhinandanVarthaman was accompanied by IAF Group Captain Joy Thomas Kurien, Defence Attache to Indian High Commission in Pakistan. https://t.co/CWNiLvYFgU
— ANI (@ANI) March 1, 2019
भारतीय वायू दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने बुधवारी (२७ फेब्रुवारी) आपले लढाऊ विमान भारताच्या हवाई हद्दीत आणत पुन्हा कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पाकिस्तानचे लढाऊ विमान परतवून लावताना भारताचे ‘मिग-२१’ हे लढाऊ विमान कोसळले. याच दरम्यान भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या हाती लागले. पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून याबाबतचा व्हिडीओ देखील व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर तातडीने भारताकडून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू झाले. अखेर भारताच्या या प्रयत्नांना मोठे यश आले असून भारतीय कमांडर अभिनंदन सुखरूप भारतात परतले आहेत.
Visuals from Attari-Wagah border; Wing Commander #AbhinandanVarthaman to be received by a team of Indian Air Force. pic.twitter.com/C4wv14AEAd
— ANI (@ANI) March 1, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.