HW News Marathi
देश / विदेश

केंद्राच्या सूचनेनंतर युट्युबने कमांडर अभिनंदन यांचे आक्षेपार्ह व्हिडीओज हटविले

नवी दिल्ली | भारतीय वायू दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने बुधवारी (२७ फेब्रुवारी) आपले लढाऊ विमान भारताच्या हवाई हद्दीत आणत पुन्हा कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पाकिस्तानचे लढाऊ विमान परतवून लावताना भारताचे ‘मिग-२१’ हे लढाऊ विमान कोसळले. याच दरम्यान भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या हाती लागले. पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून याबाबतचा व्हिडीओ देखील व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर तातडीने भारताकडून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू झाले. दरम्यान, यानंतर अभिनंदन यांचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ हेतुपूर्वक सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले.

कमांडर अभिनंदन यांचे हे आक्षेपार्ह व्हिडीओज सोशल मीडिया विशेषतः यूट्युबवरून हटविण्यात यावेत, अशी सूचना केली आहे, अशी सूचना आयटी मंत्रालयाकडून करण्यात आली होती. केंद्राने थेट गुगलला पत्र पाठवून आयटी अ‍ॅक्ट २००० मधील कलम ६९ अंतर्गत विंग कमांडर अभिनंदन यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ हटवण्याची सूचना केली होती. या सूचनेप्रमाणे आता यूट्युबने हे सर्व व्हिडीओज हटविले आहेत. पाकिस्तानकडून हेतूपूर्वक हे व्हिडीओज व्हायरल करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#AyodhyVerdict | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणार, ‘मुस्लीम लॉ बोर्डा’चा निर्णय

News Desk

मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी, पाकिस्तानतून धमकीचा फोन

News Desk

भाजप नेते हिंदू तरुणींवर बलात्कार करतात | अरविंद केजरीवाल

swarit