HW News Marathi
मुंबई

पालघर जिल्ह्यातील डहाणूत भूकंपाचे जोरदार धक्के

पालघर | डहाणू तलासरी भागात पुन्हा जोरात भूकंपाचा धक्का बसला आहे. आज (१ मार्च) सकाळी ११.१४ वाजता मोठा धक्का बसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. आज जाणवलेल्या धक्क्यानंतर भूकंप क्षेत्राचा विस्तार वाढला असल्याचे बोलले जात आहे. आजवरचा हा सर्वात मोठा धक्का ४.३ मॅग्नेट्यूट आहे. मागील महिन्यात ४.१ चा धक्का बसला होता. कारण गुजरातच्या उंबरगाव पासून पालघरच्या तारापूरपर्यंत हा धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. सतत पालघर परिसरात भूकंपाचे धक्के बसल असल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण परसले आहे.

 

याआधी पालघरमध्ये भूकंपाचे हादरे बसत आहेत. गुरुवारी (७ फेब्रुवारी) सायंकाळी देखील भूकंपाचे धक्के पालघरमधील स्थानिकांना जाणवले होते. तर शक्रवारी (८ फेब्रुवारी) पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. डहाणू आणि तलासरी या भागात ३.३ रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता नोंदविण्यात आली आहे. बुधवार (१३ फेब्रुवारी) रोजी अवघ्या २४ तासांत पालघर आणि तलासरी भागात ४ भूकंपाचे धक्के बसल्याने स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चालत्या लोकल मध्ये ‘किकी चॅलेंज’, तरुणाचा शोध सुरू

swarit

कृषीमंत्र्यांना भेटू द्या, अन्यथा सातव्या मजल्यावरून उडी मारेन video

News Desk

महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुटले

News Desk