HW News Marathi
महाराष्ट्र

धक्कादायक! बीड जिल्हा परिषदच्या लेखा अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल

बीड | बीड जिल्हा परिषदच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा लेखाअधिकारी, अ.व.बुरांडे यांचा टेबलवर बसून लाज घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये अधिकारी बुरांडे हे टेबलवरील फाईल सरकवित असून एक व्यक्ती टेबलवर पैसे ठेवतो. फाईलवर पैसे ठेवल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही, अशीच काही परिस्थिती बीडमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयात अधिकारी पैसे घेऊन कामे करतात, हे यातून दिसून येत आहे.

यामुळे एकूणच बीड जिल्हा परिषद मधील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून यासंदर्भात लेखाधिकारी बुरांडे यांना विचारले असता. मी कधी कोणाकडून पैसे घेतले आहेत. मला आठवत नाही. मात्र, माझा खाजगी व्यवहार असू शकतो, असे फोनवरून सांगितल.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यामध्ये विकास कामाच्या फाईल पुढे सरकण्यासाठी अधिकारी टेबलवर पैशाची मागणी करतात. व ते पैसे स्वीकारताना देखील दिसून येत आहेत. त्यामुळे नेमका बीड जिल्ह्यामध्ये फाईलवर वजन ठेवल्याशिवाय कुठली फाईल पुढे सरकत नसल्याचे बोलले जात आहे. एकंदरीतच भ्रष्टाचाराचे कुरण झालेल्या या सर्व कार्यालयामध्ये अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लातूरमध्ये परिचारक यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

News Desk

मुंबईत ५ तर अहमदनगरमध्ये १, एकूण ६ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, राज्याचा आकडा १०७ वर

swarit

समीर वानखेडेंच्या सत्कारावर आक्षेप; राज्य सरकारकडे कारवाईची मागणी

News Desk