HW News Marathi
देश / विदेश

भारताने केलेल्या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तान ट्रोल

धनंजय दळवी | भारतीय हवाई दलाने मंगळवारी (२६ फेब्रुवारी) पहाटे ३.३० वाजता पाकिस्तान येथील दहशतवादी तळावर हल्ला केल्यानंतर देशभरात त्याचे कौतुक केले जात आहे. या हल्ल्यात २०० ते ३०० अतिरेकी ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर अनेकांनी भारतीय जवानांचे कौतुक करताना पाकिस्तानला ट्रोल करण्याची संधी सोडली नाही.

https://www.instagram.com/p/BuVWjsLAf25/?utm_source=ig_web_copy_link

आता सोशल मीडियावरून पाकिस्तानवर टीकेची झोड उडवली जात आहे. भारताने केलेल्या हलल्यानंतर पाकिस्तानची झोप उडाली असून पाकिस्तान आता युद्धाच्या कशा पद्धतीने तयारी करत असेल अशा प्रकारचे गंमतीदार फोटो सोशल मीडियावर टाकले जात आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर भारतीय हवाई दलाचे अभिनंदन केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पासून ते सामान्य माणसांपर्यंत लोकांना ट्रोल केले जात आहे. आज पहाटे ३.३० च्या सुमारास भारतीय वायू दलाच्या १२ ‘मिराज २०००’नी पाकव्याप्त काश्मीरमध्ये १००० किलोचे बॉम्ब टाकले. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करण्यात भारताला यश आले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चांद्रयान -२ आज अवकाशात झेपावणार

News Desk

आता ड्रगप्रकरणी NCB ने कंगनाची स्वतःहून चौकशी करावी !

News Desk

सीबीएसई बोर्डाचा १२ वीचा निकाल जाहीर, ८८.७८ % विद्यार्थी उत्तीर्ण

News Desk