मुंबई | पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या अवघ्या १२ दिवसांनंतर भारतीय वायू सेनेने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. वायू सेनेने पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलो वजनाचा बॉम्ब फेकला. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतीय वायू सेनेने केलेली ही आत्तापर्यंत सर्वांत मोठी कारवाई असल्याचे म्हटले जाते. या कारवाईनंतर भारतीय वायू दल, सैन्य आणि सरकारचे देशभरातून कौतुक होत आहे. यात बॉलिवूड कलाकार देखील मागे नाही. विकी कौशल, रजनीकांत, राजकुमार राव, कपिल शर्मा, अनुपम खेर, परेश रावल, मुग्धा गोडसे, अभिषेक बच्चन, अजय देवगण, अक्षय कुमार अशा अनेक बॉलिवूड कलाकारांनी भारतीय वायू दलाच्या कामगिरीला सलाम केला आहे.
‘उरी’ या प्रसिद्ध चित्रपटानंतर प्रकाश झोतात झालेला अभिनेता विकी कौशल याने देखील ट्विट करून आयडी भारतीय वायू दलाला सलाम केला आहे.
Salute to the #IndianAirForce and our Intelligence Department. #IndianStrikesBack . Jai Hind 🇮🇳
— Vicky Kaushal (@vickykaushal09) February 26, 2019
अभिनेता अजय देवगणने “Mess with the best, die like the rest. Salute” असे ट्विट करत, या भारतीय वायू दलाच्या कारवाईचे तोंडभर कौतुक केले आहे. म्हणजेच ‘शक्तिशाली व्यक्तिशी वैर पत्करले तर उध्वस्त व्हाल,’ असे अजय देवगणने म्हटले आहे.
Mess with the best, die like the rest. Salute #IndianAirForce.@narendramodi.
— Ajay Devgn (@ajaydevgn) February 26, 2019
भारत माता की जय, असे ट्विट करत अभिनेते अनुपम खेर यांनी देखील भारतीय वायू दलाच्या कारवाईचे कौतुक केले आहे.
I got this poem/text as a message. It compares the life of a soldier with that of a civilian. It moved me & made me realise how easy it is to take armed forces & their sacrifices for granted. Please share it with the world. Thanks to the person who wrote it.🙏 #SaluteToASoldier pic.twitter.com/zcwchcDFs5
— Anupam Kher (@AnupamPKher) February 15, 2019
“आजची सकाळ खरंच फार सुंदर होती”, असे ट्विट करत अभिनेते परेश रावल यांनी मोदी सरकार आणि भारतीय वायू दलाचे आभार मानले आहेत.
A TRULY BEAUTIFUL GOOD MORNING. THANKS @narendramodi SIR AND BRAVEHEARTS OF OUR ARMY . JAI HO . 🇮🇳🇮🇳🇮🇳
— Paresh Rawal (@SirPareshRawal) February 26, 2019
“अंदर घुस के मारो” असे म्हणत आपल्याला भारतीय वायू दलाच्या कारवाईचा अभिमान वाटतो, असे अभिनेता अक्षय कुमार याने म्हटले आहे.
Proud of our #IndianAirForce fighters for destroying terror camps. अंदर घुस के मारो ! Quiet no more! #IndiaStrikesBack
— Akshay Kumar (@akshaykumar) February 26, 2019
“नयी दिशा नयी दशा…नयी रीति नयी नीति…नए भारत को, सच्चे भारत के सपूतों को शत शत नमन…”, असे लिहित गायक कैलाश खेर यांनी भारतीय जवानांना अभिवादन केले आहे.
नयी दिशा नयी दशा.. नयी रीति नयी नीति.. नए भारत को, सच्चे भारत के सपूतों को शत शत नमन. #ekbharatshreshthbharat https://t.co/m0fIqhxAz6
— Kailash Kher (@Kailashkher) February 26, 2019
साऊथचे प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी देखील आपल्या शैलीत भारताचे कौतुक केले आहे.
BRAVO INDIA 🇮🇳👏🏻👏🏻👏🏻
— Rajinikanth (@rajinikanth) February 26, 2019
“आमचा देश आणि मानवाविरुद्ध दहशतवादी कारवाया करणाऱ्यांच्या भारतीय वायु दलाकडून करण्यात आलेल्या या कारवाईला माझा सलाम. जय हिंद.”, असे ट्विट प्रसिद्ध अभिनेता राजकुमार रावने केले आहे.
Saluting our #IndianAirForce for carrying out this strike against terror elements that pose a threat to our country and humanity. Jai hind!🇮🇳 #IndiaStrikesBack
— Rajkummar Rao (@RajkummarRao) February 26, 2019
प्रसिद्ध विनोदी कलाकार आणि अभिनेता कपिल शर्माने देखील “आपल्याला भारतीय वायू दलाचा अभिमान आहे”, असे ट्विट केले आहे.
proud of our #IndianAirForce #IndiaStrikesBack #titfortat #neverforgetneverforgive salute 🙏 #JAIHIND 🇮🇳 pic.twitter.com/gaZXnYdsEB
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) February 26, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.