नवी दिल्ली | “भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संबंध अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. या दोन्ही देशांमध्ये सध्या निर्माण झालेला तणाव हा सर्वाधिक आहे”, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. “भारतात पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. त्यामुळे आता भारत पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहेत. त्यांची मनस्थिती मी समजू शकतो. “, असेही ट्रम्प यावेळी म्हणाले.
#WATCH US President Donald Trump says "There’s a terrible thing going on right now between Pakistan and India. It's a very very bad situation and it is a dangerous situation between the two countries. We would like to see it stop. Lot of people were just killed." #PulwamaAttack pic.twitter.com/oZAi4pRVsU
— ANI (@ANI) February 23, 2019
“पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये आजपर्यंतची सर्वात जास्त तणावाची परिस्थिती निर्माण आहे. भारताच्या भावना आम्ही समजू शकतो. आम्ही हा तणाव कमी होण्यासाठीचा प्रयत्नशील असून दोन्ही देशांच्या संपर्कात आहोत. आमची चर्चा सुरू आहे. मात्र, या चर्चेत अनेकांचा सहभाग असल्याने या चर्चेत समतोल साधणे हे मोठे आव्हान आहे”, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
#WATCH US Pres says, "I stopped paying Pak the 1.3 billion dollars that we were paying them. We may set up some meetings with Pak. Pak was taking strong advantage over US. We've had, we've developed a better relationship with Pak over the last short period of time than we had." pic.twitter.com/5b05CKDZvT
— ANI (@ANI) February 23, 2019
“अमेरिकेकडून पाकिस्तानला दिली जाणार १.३ अब्ज डॉलरची आर्थिक मदत देखील थांबवली आहे. आम्ही पाकिस्तानसोबत काही बैठका घेणार आहोत. यापूर्वीच्या राष्ट्रपतींच्या काळात पाकिस्तानला अमेरिकेच्या मदतीचा मोठा फायदा झाला. मात्र पाकिस्तान अपेक्षित मदत करत नसल्याने मी ही मदत थांबवली आहे”, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घडवून आणलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जगभरातील रोषाला सामोरे जावे लागत आहे. या हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. या घटनेविषयी दुःख व्यक्त करणे दूरच परंतु त्या उलट पाकिस्तानकडून वारंवार मुजोरीची भाषा करण्यात येत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.