HW News Marathi
देश / विदेश

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी ऑनलाईन मतदानाची सुविधा उपलब्ध नाही

मुंबई । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ऑनलाईन मतदानाची कोणतीही सुविधा उपलब्ध नसून, अशी सुविधा उपलब्ध असल्याचा सोशल मिडियावर विशेषतः व्हॉट्सॲपवर फिरणारा मेसेज खोटा आहे. ही चुकीची माहिती पसरत आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

आगामी निवडणुकांसाठी भारतीय पासपोर्टधारक अनिवासी नागरिक आता (एनआरआय) ऑनलाईन मतदान करुन शकणार आहेत, अशा आशयाचा मेसेज सध्या सोशल मिडियावर विशेषतः व्हॉट्सॲपवर फिरत आहे. मात्र, हा मेसेज खोटा असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आता स्पष्ट केले आहे.

भारतीय निवडणूक आयोगाने भारतीय तसेच अनिवासी भारतीय नागरिकांसाठी मतदार नोंदणीची ऑनलाईन सुविधा nvsp.in या पोर्टलवर उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यामुळे अनिवासी नागरिकांनाही ऑनलाईन मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आसाममध्ये उल्फाच्या दहशतवाद्यांकडून ५ तरुणांची अमानुषपणे हत्या

Gauri Tilekar

कठुआ बलात्कार हत्या प्रकरणाचा आज निकाल

News Desk

अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस आपल्या पदावरून पायउतार

News Desk