HW News Marathi
राजकारण

आंबेडकरांचा गेम प्लॅन नेमका काय हे आम्हाला कळत नाही ! 

पुणे । “काँग्रेसची प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याची तयारी आहे. परंतु, त्यांच्याकडूनच कोणताही प्रतिसाद मिळत नसून आमच्या प्रस्तावाची टाळाटाळ होत आहे. त्यांचा गेम प्लॅन नक्की काय आहे, हेच आम्हाला समजलेले नाही,” असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. ते शुक्रवारी (२२ फेब्रुवारी) पुण्यात बोलत होते.

“आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस देशभरातील विविध छोट्या मोठ्या पक्षांशी आघाडी करत आहे. मतविभाजन टाळण्यासाठी, धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पडून भाजप-शिवसेनेला त्याचा फायदा मिळू नये यासाठी अम्ही प्रयत्न करीत आहोत”, असे चव्हाण यांनी सांगितले. “२०१४मध्ये स्वतंत्र लढल्याने आम्हाला त्याचा फटका बसला होता. म्हणूनच आम्ही प्रकाश आंबेडकरांना आघाडीत सामील होण्यास सांगत आहोत. मात्र त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही. तरीही आमची आशा कायम असून आम्ही चर्चेला तयार आहोत”, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू; ‘या’ मुद्द्यांवर अधिवेशन जागण्याची शक्यता

Aprna

शासकीय अधिका-यांची कारकिर्द व भवितव्य धोक्यात

swarit

विधान परिषदेच्या निकालानंतर ‘मविआ’मध्ये मोठा स्फोट; शिवसेनेचे एकनाथ शिंदे नॉट रिचेबल 

Aprna