नवी दिल्ली | पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या २ नेमबाजांना व्हिसा नाकारण्यात आला आहे. याविरोधात पाकिस्तानने नॅशनल राफल असोसिएशन ऑफ या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेकडे केली होती. मात्र भविष्यात कुठल्याही ऑलिम्पिक आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत भारतावर बंदी घातली आहे. आयओसीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत झालेल्या चर्चेनंतर यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला.
#FLASH International Olympic Committee has suspended all discussions with India on hosting any international event until clear written guarantees are obtained from the Indian government of complying with the Olympic Charter. https://t.co/a9S4uiP5l1
— ANI (@ANI) February 22, 2019
यासाठी आयओसीने यासंदर्भात एक पत्रकच प्रसिद्ध केले आहे. ”भारतीय एनओसी, आयओसी आणि आयएसएसएफने अखेरपर्यंत प्रयत्न केले. मात्र तरीही पाकिस्तान संघाला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काही मार्ग निघाला नाही. या परिस्थिती कुठल्याही प्रकराचा भेदभाव न करण्याच्या आयओसीच्या मूळ चार्टरच्या विरोधात जाणारी आहे. कुठल्याही स्पर्धेच्या यजमान देशात स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या सर्व खेळाडूंना कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाविना निपक्षपातीपणे आणि समानतेच्या वातावरणात खेळण्याची संधी मिळावी. यासाठी आयओए कटिबद्ध आहे.”असे या पत्रकात म्हटले आहे.
ही आंतरराष्ट्रीय नेमबाजी सध्या राजधानी दिल्लीमध्ये सुरू आहे. या स्पर्धेतून २०२० मध्ये होणाऱ्या टोक्यो ऑलिंपिक स्पर्धेसाठी १६ कोटा मिळू शकणार होता. परंतु आता ते रद्द करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून नेमबाज जीएम बशीर आणि खलील अहमद यांनी व्हिसासाठी अर्ज केला होता, पण दोघांनाही व्हिसा नाकारण्यात आला. भारताने या दोघांना व्हिजा नाकारल्याने या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने भारताला १४ कोट्यांसह नेमबाजी विश्वचषक आयोजित करण्याची परवानगी दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.