HW News Marathi
क्रीडा

नांदेडच्या पोलीस मैदानाचे नामकरण

नांदेड पोलीस कवायत मैदान व क्रिडा संकुलाचे झाले नामकरण… उत्तम बाबळे नांदेड :-पोलीस कवायत मैदान, क्रीडा संकुलाचे नामकरण १ मे रोजी पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले असून आता नवीन पोलीस कवायत मैदानाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज कवायत मैदान असे नामकरण कोनशीलेचे आनावरन करुन करण्यात आले. त्यानंतर याच प्रांगणातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठीच्या इंद्रधनु पोलीस क्लबचेही उद्घाटन करण्यात आले. तसेच जुन्या पोलीस कवायत मैदानाचे श्री गुरु गोबिंदसिंघजी क्रीडा संकुल असे नामकरण करण्यात आले आहे. त्या कोनशीलेचही ना. खोतकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तत्पूर्वी वाहतूक पोलीसांसाठीच्या तीन अद्ययावत मोटारी तसेच दोन व्हॅन्सचे उद्घाटनही पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. ‍जिल्हा पोलीस अधीक्षक येनपुरे यांनी या सर्व उपक्रमांबाबत प्रास्ताविक केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#IndiaVsPakistan : पावसाचे संकट टळले मात्र धाकधूक कायम

News Desk

कोहलीचा नवा विक्रम, सचिनला टाकले मागे

News Desk

फ्रेंच ओपनमध्ये राफेल नदालचं अकरावं विजेतेपद

News Desk