नवी दिल्ली | “तुम्ही कराल ती खुद्दारी आणि दुसऱ्याने केली कि गद्दारी”, अशा शब्दांमध्ये काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये सिद्धू यांनी मोदींचे चार फोटो देखील जोडले आहेत. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नवज्योत सिंग सिद्धू यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. “मी तुमच्या भाड्याच्या ट्रोल्सना घाबरत नाही”, असेही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
पीएम साहब आप का डायलॉग खुद्दारी,
किसी और का डायलॉग गद्दारी,
सत्य पड़ेगा तुमपे भारी| @narendramodi
नही डरते तुम्हारे भाड़े के ट्रोल से| pic.twitter.com/TjmGjOEMPV— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) February 21, 2019
पंतप्रधान मोदींचे पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह असलेले फोटोज या ट्विटसोबत जोडण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांचा इम्रान खान यांच्यासोबतच फोटोज तसेच पंतप्रधान मोदी-सौदी अरेबियाचे राजपुत्र बिन सलमान यांची भेट यावर वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखांचे फोटोज देखील या ट्विटमध्ये जोडण्यात आले आहे. “पीएम साहब आप का डायलॉग खुद्दारी, किसी और का डायलॉग गद्दारी, सत्य पड़ेगा तुमपे भारी. नही डरते तुम्हारे भाड़े के ट्रोल से”, असे ट्विट करत नवज्योत सिंग सिद्धूंनी त्यात पंतप्रधान मोदींना टॅग देखील केले आहे.
पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए.मोहम्मदने घडवून आणलेल्या या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर संतप्त नागरिकांकडून ‘पाकिस्तानला धडा शिकविण्याची’ मागणी होत असताना सिद्धू यांनी ‘हा प्रश्न चर्चा करून सोडवला पाहिजे’ असे म्हटल्यानंतर सिद्धू यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर “आज जे मला देशद्रोही म्हणत आहेत, त्याच लोकांनी मसूद अजहरची सुटका केली आणि त्याला पाकिस्तानला पाठवले. त्यांनी गेल्या २० वर्षात अझरच्या अटकेसाठी काय केले ?” असा सवाल सिद्धू यांनी विचारला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.