HW News Marathi
मुंबई

बारमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा धिंगाणा, कर्मचाऱ्यांना जबर मारहाण

मुंबई | डोंबिवलीमधील एका बार मध्ये रात्री उशिरा एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने दारू पिऊन मोठा तमाशा केल्याचा प्रकार समोर आला आहे. विजयसिंग पवार असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून तो डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. दारूच्या नशेत असलेल्या विजयसिंग पवार यांनी १४ फेब्रुवारीला या बारमध्ये शिवीगाळ करत येथील कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केली होती. या प्रकरणी बार मालक माधवी सहस्त्रबुद्धे यांनी कल्याण पोलीस उपयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

विजयसिंग पवार हे डोंबिवली पूर्व येथील ‘चंदू पॅलेस बार ऍण्ड रेस्टॉरंट’मध्ये दारूच्या नशेत होता. यावेळी बारचा मालक नव्हता. मात्र विजयसिंग पवार यांनी बारमधील दारूच्या बाटल्या फोडत शिवीगाळ करायला सुरु केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. विजयसिंग पवार इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी बारमधील कर्मचाऱ्यांना मारहाण करत त्यातील एकाला तुरुंगातही डांबले. विजयसिंग पवार यांनी याआधीही येथे येऊन मुलीची आणि २५ लाख रुपयांची मागणी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांचा लाल सागर मुंबईत धडकला, सरकारची धावपळ सुरू

News Desk

पश्चिम रेल्वेकडून महिला प्रवाशांना अनोखी भेट

News Desk

भाजपकडून सतत ऑफर – नारायण राणे

News Desk