HW News Marathi
महाराष्ट्र

रायगडमधील एसटी बसमध्ये आयईडी बॉम्ब, जिल्ह्यात हायअलर्ट जारी

मुंबई | कर्जतमधील आपटा वस्तीतील एसटी बसमध्ये बाँम्बसदृश्य वस्तू सापडल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या एस.टी. मधील बॉम्ब निकामी करण्यास रायगड पोलिसांना यश आले असून हा आयईडी बॉम्ब असल्याची माहिती मिळत आहे. या परिसरात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. एसटीमध्ये बॉम्ब असल्याची माहिती पोलीस आपटाच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर पोलिसांनी या परिसरात घेराव घातल्याने या गावाला छावणीचे स्वरूप आले होते. रायगडमध्ये देखील आता हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

बुधवारी रात्री ११ च्या सुमारास आपटा गावांमध्ये एका एसटीत बॉम्बची सदृश्य वस्तूची चर्चा सुरू होती. रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांना ही माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. त्याचप्रमाणे अलिबागहून बॉम्बशोधक पथकही दाखल झाले. बाँम्ब सदृश्य वस्तू पाहण्यासाठी आपटा गावातील नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती.

“ती बॉम्बसदृश वस्तू आता तपासासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली आहे. त्याची तपासणी झाली कि ते नेमके काय होतं याची माहिती आपल्याला मिळेल. ती वस्तू आता निकामी करण्यात आली आहे. याबाबतचा तपास अद्याप सुरु आहे. आयईडी म्हणजे इम्प्रोवाईज्ड एक्सकॅल्युझिव्ह डिव्हाईस म्हणजे फॅक्टरीमी मेड बॉम्ब होय. ही एक कॉमन टर्म आहे.”

– रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हवाई दलाचे विमान कोसळले

News Desk

शिवस्मारक समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा विनायक मेटेंनी दिला राजीनामा

News Desk

‘ही घ्या शिवसेनेच्या बाटग्यांची यादी!’, नितेश राणेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

News Desk