HW News Marathi
महाराष्ट्र

‘ही घ्या शिवसेनेच्या बाटग्यांची यादी!’, नितेश राणेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

मुंबई | शिवसेना आणि भाजप मधला तणाव आणि वाद सध्या वाढताना दिसत आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या टाके वरून शिवसेना आणि भाजप मध्ये चांगलंच राजकारण पेटलेलं दिसून येत आहे. भाजपमध्ये उपऱ्यांना, बाटग्यांना स्थान नव्हतं. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे, अशी घणाघाती टीका आज(२ ऑगस्ट) सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी केली होती.

शिवसेनेच्या बाटग्यांची यादी!

संजय राऊतांनी ‘बाटग्यांवरुन’ केलेली टीका नितेश राणेंना चांगलीच झोंबली आहे. त्यांनी राऊतांना प्रत्त्युत्तर म्हणून ‘शिवसेनेच्या बाटग्यांची यादी!, असं म्हणत शिवसेनेमधल्या आयरामांची यादी प्रसिद्ध केली आहे. शिवसेनेतील बाटग्यांच्या महामंडळाची यादी तशी लांब आहे.. पण थोडी माहितीसाठी, असं म्हणत त्यांनी शिवसेनेतील आयारामांची काही नावे सांगितली आहेत. सचिन आहिर – bks ची जबाबदारी… राहुल कनाल – शिर्डी संस्था… आदेश बांदेकर – सिद्धिविनायक संस्था… उदय सामंत – कॅबिनेट मंत्री… अब्दुल सत्तार – मंत्री…. प्रियांका चतुर्वेदी – खासदार असं ट्विट त्यांनी केलं आहे.

 

काय होता अग्रलेख?

शिवसेना संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून भाजप वर जोरदार टीका केली आहे. “भारतीय जनता पक्ष हा कधीकाळी निष्ठावंत, जमिनीवरील कार्यकर्त्यांचा पक्ष होता. एका विचाराने भारलेली हिंदुत्ववादी विचारांची पिढी या पक्षात होती. उपऱ्यांना, बाटग्यांना येथे स्थान नव्हते. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे.”

“शिवसेनेच्या स्थापनेपासून सगळ्यात जास्त त्रास कोणी दिला असेल तर तो आपल्यातल्याच बाटग्यांनी. बाटगा जरा जोरातच बांग देतो व आपणच कसे कडक निष्ठावान आहोत यासाठी लक्ष वेधून घेत असतो. प्रसंगी तो जिभेवाटे गटारही मोकळे करून सर्वत्र दुर्गंधी पसरवतो. या दुर्गंधीमुळे आज कमळाचे पावित्र्य व मांगल्य साफ कोमेजून गेले आहे.”

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणेंनी उद्घाटनासाठी अमित शाह यांच्या रुपाने अत्यंत योग्य व्यक्तीची निवड केली – चंद्रकांत पाटील

News Desk

ठरलं! शिक्षक आणि विद्यार्थ्यांना यावर्षी दिवाळीची सुट्टी केवळ ५ दिवस

News Desk

मुख्यमंत्र्यानी कोरोनाचा इतका अभ्यास केला आहे की ते  अर्धे डॉक्टर झाले आहेत – अजित पवार

News Desk