HW News Marathi
राजकारण

चौकीदाराच्या चोरीत आता सत्तेसाठी लाचार असलेली शिवसेना देखील भागीदार !

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (१८ फेब्रुवारी) संध्याकाळी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भाजप-सेनेच्या युतीबाबत अधिकृत घोषणा केली आहे. “भ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची आज अभद्र युती झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार, अफजल खान उर्फ अमित शाह व अमित शाह यांच्या म्हणण्यानुसार उंदीर उर्फ उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली आहे. ही राफेल चोर आणि सत्तेसाठी लाचाराची युती आहे”, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी युतीच्या घोषणेनंतर केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-भाजपच्या युतीची अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादीकडून प्रचंड टीका केली आहे. “चौकीदाराच्या चोरीमध्ये आता सत्तेसाठी लाचार असलेली शिवसेना देखील भागीदार झाली आहे. महापालिका निवडणुकीवेळी शिवसेनेने भाजपच्या भ्रष्ट मंत्र्यांवर एक पुस्तिका काढली होती. आज त्या पुस्तिकेच्या पानांची फुले तयार करून त्याचे तोरण अमित शाह यांच्या स्वागतासाठी मातोश्रींच्या दारावर लावले होते”, असा खोचक टोला अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.

“मला फसवणूक झालेल्या या शिवसैनिकांबद्दल सहानुभूती आहे. सत्तेच्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तरी मोदींचे सरकार घालवण्यातच देशाचे आणि महाराष्ट्राचे हित आहे हे जाणणारा सामान्य शिवसैनिकही मोदींच्या विरोधात काँग्रेस आघाडीला मतदान करतील असा विश्वास व्यक्त करून उद्धव ठाकरेंची ही बदलेली भूमिका पाहून सरड्यालाही स्वतःची लाज वाटली असेल. टायगर अभी लाचार है”, असे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

“शिवाजी पार्कमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर झालेल्या जाहीर सभेत शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानंतरही वारंवार शिवसेना स्वबळावर लढणार असून भाजपशी युती करणार नाही अशा पोकळ घोषणा केल्या होत्या. युती गेली चुलीत असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. आज उद्धव ठाकरेंनी स्वतःचा स्वाभिमान चुलीत घातला आणि भाजपसमोर लोटांगण घातले आहे. हा तमाम शिवसैनिकांचा अवमान आणि विश्वासघात आहे”, असेही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपाचे सुरेश धस विजयी, धनंजय मुंडेंना धक्का

News Desk

ठाण्यातून राष्ट्रवादीचे ‘गणेश नाईक’ यांना उमेदवारी मिळणार का ?

News Desk

महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांविरोधात महाविकास आघाडीचा 17 डिसेंबरला भव्य मोर्चा

Aprna