HW News Marathi
राजकारण

शरद पवारांच्या मध्यस्थीने अखेर उदयनराजे-शिवेंद्रराजेंचे मनोमिलन

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (९ मार्च) मुंबईत सातारा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यावी याबाबतचा निर्णय घेण्यासाठी सातारा लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसह बैठक घेतली होती. या बैठकीसाठी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे उपस्थित होते. आता अखेर उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद मिटला असून मनोमिलन झाले आहे.

गेल्या काही काळापासून उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात मोठा राजकीय संघर्ष पेटला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांचे काम न करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या एका मोठ्या गटाने घेतला होता. पक्षातील वरिष्ठ नेत्यांना देखील तसे कळविण्यात आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीपुढे सातारा मतदारसंघांच्या उमेदवारीचा मोठा प्रश्न उभा राहिला होता. मात्र, आता उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या मनोमिलनानंतर याबाबतचा पक्षावरील ताण बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात युतीसाठी झुकणार नाही !

News Desk

जिवंत हिंदू हेच बाळासाहेबांच्या विचारांचे दीपस्तंभ !

News Desk

राष्ट्रवादीला लोकसभेत दोन अंकी आकडा गाठणे शक्य नाही !

News Desk