HW News Marathi
राजकारण

भाजप अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मातोश्री’वर दाखल

मुंबई | आगामी निवडणुकांच्या दृष्टीने देशातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. भाजप-शिवसेनेच्या युतीचा तिढा देखील आज (१८ फेब्रुवारी) सुटणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह भाजप-सेनेच्या युतीच्या चर्चेसाठी आणि अंतिम निर्णय जाहीर करण्यासाठी थोड्याच वेळापूर्वी मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. मुंबईतील सॉफीटल हॉटेलमध्ये अमित शाह यांची भाजप नेत्यांसह चर्चा झाली असून आता अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’वर दाखल झाले आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, प्रकाश जावडेकर देखील उपस्थित आहेत.

थोड्याच वेळापूर्वी ‘मातोश्री’वर देखील उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या नेत्यांची बैठक झाली. अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर थोड्याच वेळात म्हणजेच संध्याकाळी ६.३० वाजता वरळीतील ब्ल्यू-सी बँक्वेटमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येईल. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना आणि भाजपची युती होणार कि नाही ? युती झाली तर मोठा भाऊ कोण ठरणार ? याबाबत राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आले होते. या सर्व प्रश्नांची अधिकृत उत्तरे आजच्या पत्रकार परिषदेत मिळतील.

असा आहे अमित शहा यांचा मुंबईतील दिनक्रम

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मी महाराष्ट्राच्या विकासाचे कंत्राट घेतलेय” उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे सडेतोड उत्तर

Aprna

भाजपला चढलेली सत्तेची मस्ती जनतेनेच उतरवयाला हवी | सुप्रिया सुळे

Gauri Tilekar

नगरमध्ये सुजय विखे-पाटील यांना काँग्रेसकडून जाहीर पाठिंबा

News Desk