HW News Marathi
राजकारण

नगरमध्ये सुजय विखे-पाटील यांना काँग्रेसकडून जाहीर पाठिंबा

अहमदनगर | नगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत फूट पडल्याचे चित्र दिसत आहे.भाजपने डॉ. सुजय विखेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सुजय विखे-पाटील यांना नगरमधून काँग्रेस, शिवसेना आणि इतर मित्र पक्ष त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. नगरच्या राजकारणने वेगळेच वळण घेतले चित्र दिसत आहे.

विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजयने भाजपत प्रवेश केल्यानंतर अहमदनगरसह राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला होता. नगर जिल्ह्यात विखे घराण्याचे संबंध अधिक दृढ आहेत. तिथल्या नागरिकांशी विखे कुटूंब ऋणानुबंध जोडले गेले आहेत. पक्षापेक्षा संबंधांना अधिक माणणारे लोक तिथे आहेत याचाच फायदा सुजय विखेंना राजकारणात देखील होत असल्याचे चित्र दिसत आहे.

सुजय विरूद्ध राष्ट्रवादी काॅंग्रेसकूडन संग्राम जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु आता काँग्रेस राष्ट्रवादीमध्येच फूट पडली आहे. यामुळे संग्राम जगतापांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे, असे बोलल्या जात आहे. नुकताच काँग्रेस जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब हराळ यांनी भाजपच्या सुजय विखेंना जाहीर पाठिंबा दिला आहे. दरम्यान, राज्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असताना नगरमधील चित्र आघाडीसाठी नक्कीच धक्कादायक आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गिरीश महाजनांना मुख्यमंत्री बनवा !

News Desk

लोकसभेत शिवसेनेच्या 18 खासदारांना भावना गवळींनी दिलेली व्हिप लागू होणार! – एकनाथ शिंदे

Aprna

काँग्रेसने आमदारांच्या फोडाफोडीचे आरोप पुराव्यासहित सिद्ध करावेत !

News Desk