पुलवामा हल्ल्याच्या दोन दिवसानंतरच आज भारतीय हवाई दलाने भारत-पाक नियंत्रण रेषेजवळील जैसलमेरच्या पोखरणमध्ये युद्धसराव केला. या युद्धाभ्यासात 130 लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, अॅडव्हान्स लाईट हेलिकॉप्टरचा समावेश होता. वायुशक्ती 2019 च्या कार्यक्रमांअतर्गत हे शक्तीप्रदर्शन करण्यात आले आहे. कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही सक्षम असल्याचे हवाई दल प्रमुख बीएस धनोआ यांनी म्हटले आहे.
#WATCH Vayu Shakti 2019, firepower demonstration of the Indian Air Force at Pokhran Range in Rajasthan. pic.twitter.com/sdSV5ZxC2n
— ANI (@ANI) February 16, 2019
या युद्धाभ्यासात सुखोई-30, मिग-29, मिराज-2000, जग्वार, मिग-27 सारख्या अत्याधुनिक लढाऊ विमानांचा समावेश होता. हवेतून जमिनीपर्यंत मारा करणाऱ्या विमानांची ताकद यावेळी निदर्शनास आली. तसेच स्वदेशी बनावटीचे तेजस आणि अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असलेले रुद्र या हेलिकॉप्टरनेही हवेत गोळीबार करून शक्तिप्रदर्शन केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.