HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : काश्मिरी तरुणाचा वापर, सुरक्षा व्यवस्था तैनात असतानाही हल्ला 

जम्मू-काश्मीर । जम्मू-काश्मीरमधील अवंतीपुरा भागात गुरुवारी (१४ फेब्रुवारी) अतिरेक्यांकडून ज्या ताफ्यातील वाहनाला लक्ष्य करण्यात आले त्यात तब्बल ७८ वाहने होती. त्यातून २५४७ जवान प्रवास करत होते. या हल्ल्यापूर्वी गुप्तचर संस्थांनी हाय अ‍ॅलर्ट दिला होता. या ताफ्याच्या मार्गावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असतानाही हल्ला झाल्याने सुरक्षा यंत्रणेला मोठा धक्का बसला आहे.

“ज्या ताफ्यावर हल्ला झाला, त्यातील ७८ वाहनांमध्ये २,५४७ जवान होते. यापैकी बहुतांश जवान रजेवरून पुन्हा आपल्या कामावर तैनात होण्यासाठी निघाले होते. ताफा दुपारी ३.३० वाजता चिलखती गाड्यांच्या बंदोबस्तात जम्मूहून रवाना झाला. संध्याकाळपर्यंत तो श्रीनगरला पोहोचणे अपेक्षित होते. परंतु, अवंतीपोराजवळील लाटूमोड गावाजवळ हा हल्ला झाला. आयईडी स्फोटकांनी भरलेल्या कारने जवानांच्या बसचा पाठलाग केला आणि त्यानंतर कारने बसला दिलेल्या धडकेत हा भीषण स्फोट झाला”, अशी माहिती सीआरपीएफचे महासंचालक आर. आर. भटनागर यांनी दिली

इतर वेळी अशा ताफ्यातून एकावेळी साधारणपणे १००० जवानांची ने-आण केली जाते. परंतु प्रचंड बर्फवृष्टी व दुरुस्तीमुळे गेले चार दिवस हा राजमार्ग बंद होता. त्यामुळे तो मार्ग सुरु झाल्यानंतर नेहमीपेक्षा अधिक वाहने आणि जवान पाठविण्यात आले. भारतात कारद्वारे सुरक्षा जवानांच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आलेला हा पहिलाच आत्मघाती हल्ला आहे. हा हल्ला घडवून आणण्यासाठी एका स्थानिक काश्मिरी तरुणाचा वापर केला गेला, हीच भारतासाठी एक अतिशय चिंतेची बाब बनली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

व्याजदरात बदल नाही, रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर

News Desk

प्रजासत्ताक दिनी राजपथावरील संचालनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही

News Desk

धक्कादायक ! तेलंगणामध्ये महिला पोलिसाला जबर मारहाण

News Desk