HW News Marathi
देश / विदेश

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाला ‘या’ विरोधी पक्षांचा बहिष्कार

मुंबई | संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) आजपासून सुरू होणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. परंतु, राष्ट्रपतींच्या अभिभाषणात बीआरएस, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस या विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या यांनी बहिष्कार टाकला आहे.

दरम्यान, उद्योगपती गौतम अदानी आणि बीबीसी डॉक्युमेंट्री मुद्द्यांवरून संसदेत विरोधक गोंधळ घालण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सोमवारी अर्थसंकल्पापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला विरोधकांनी गौतम अदानी, बीबीसी, महिला आरक्षण विधेयक आणि जात-आधारित गणना हे मुद्दे उपस्थित केला होता. बैठकीत विरोधकांनी मांडलेल्या मुद्द्यांवर केंद्र सरकारने सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे.

तसेच केंद्र सरकारने संसदेचे कामकाज सुरळीत चालू देण्याची मागणी केली आहे. त्या व्यतिरिक्त विरोधी पक्ष बेरोजगारी आणि महागाईचा मुद्दा सभागृहात उपस्थित करू शकतात. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा समोवारी समारोप झाला असून अर्थसंकल्पापूर्वच्या सर्व पक्षीय बैठकीला गैरहजर होते.

 

 

Related posts

स्पायडरमॅन, आयर्नमॅन, ब्लॅक पँथरचे निर्माते स्टेन ली यांचे निधन

News Desk

ज्योतिरादित्य शिंदेंना मिळालं ३० वर्षांपूर्वी वडिलांनी सांभाळलेलं खातं

News Desk

स्वयंघोषित बाबा श्री श्री रविशंकर यांच्याकडून तरुणीवर बलात्कार

News Desk