HW News Marathi
क्राइम

१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू बकरला दुबईत अटक

मुंबई | १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड अबू बकर आरोपीला दुबईत अटक ठोकण्यात आल्या आहेत. या मोस्ट वाँटेंड आरोपीचे ओळख अबू बकरसह अन्य एका आरोपीला पकडण्यात आले आहे. आंतराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या कारवाई दरम्यान हे दोघे हाती लागल्याने सुरक्षा यंत्रणांचे मोठे यश मानले जात आहे. बकरला अटक ही भारतीसाठी तपास यंत्रणांना मिळालेले मोठे यश मानले जात आहे.

अबू बकर याने मुंबईच्या १९९३ स्फोट घडवून आणण्यासाठी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सोबत संधान साधले होते. त्याआधी पाकिस्तानात त्याने ट्रेनिंग देखील घेतले होते. त्यानेच आरडीएक्स मुंबईत पोहोचवले होते. त्याच्या अटकेमुळे आणखी काही गोष्टी उघडकीस येईल असा विश्वास मुंबई पोलिसांना वाटले आहे. या दोन्ही आरोपींच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय तपास यंत्रणांनी प्रयत्न सुरू केले आहेत. तो मोहम्मद आणि मुस्तफा डोसासोबत तस्करीमध्ये सहभागी होता. अबू बकर याने सोने, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आखाती देशांमधून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात तस्करी केली होती.

१२ मार्च १९९३ रोजी मुंबईतील विविध ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये २५७ जणांचा मृत्यू झाला होता. तर सातशेहून अधिक जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहीम हा अद्याप फरार आहे. या प्रकरणाती अन्य एक आरोपी याकूब मेमन याला फाशी देण्यात आली असून, मुस्तफा डोसा याचा २०१७ साली मृत्यू झाला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती

Aprna

तक्रार मागे घे , नाहीतर टांगून मारेल

News Desk

अभिनेत्री कृतिका चौधरी हिच्या हत्येचा तपास करण्यात एक महिन्यानंतर पोलिसांना यश

News Desk