HW News Marathi
राजकारण

राजकीय घडामोडींना वेग, राज ठाकरे-पवारांची गुप्त बैठक सुरू

नवी दिल्ली । आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सध्या देशातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. एकिकडे नवी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

दादरमध्ये ठाकरे-पवार यांचे स्नेही यांच्या निवासस्थानी राज आणि अजित पवार यांची बैठक झाली. दुपारी ३ वाजता दोन्ही नेते विवेक जाधव यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर सुमारे दीड तास या दोन्ही नेत्यांत चर्चा चालली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने ही भेट झाल्याचे सांगण्यात येत असले तरी भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, याचा तपशील अद्याप हाती लागलेला नाही.

या बैठकीत मनसेला महाआघाडीत सामील करून घेण्याचा निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, अद्याप अशी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रपतींनी स्वीकारला एम.जे.अकबरांचा राजीनामा

News Desk

अरुण जेटली यांनी स्वतःच राफेल कराराच्या किंमती सांगितल्या !

News Desk

आसामचे झाले कश्मीरचे कधी करणार?, उद्धव ठाकरे यांचा भाजप सरकारला सवाल

News Desk