नवी दिल्ली | राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर आज (१३ फेब्रुवारी) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या संविधान आणि लोकशाहीला वाचविण्यासाठी धरणे आंदोलन करणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या रॅलीचे आयोजन केले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देखील उपस्थित राहणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत ममता बॅनर्जींचे स्वागत करणारे आणि खिल्ली उडविणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. “दीदी यह खुलकर मुस्कुराईए, आप लोकतंत्र मे है”, असा मजकूर या पोस्टर्सवर लिहिण्यात आला आहे.
Posters put up across Delhi. West Bengal Chief Minister Mamata Banerjee is in the national capital today to join the opposition protest here today. pic.twitter.com/s9L6IcfW20
— ANI (@ANI) February 13, 2019
काहीच दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील सीबीआय विरुद्ध स्थानिक पोलीस वाद चव्हाट्यावर आला होता. सीबीआय पथक शारदा आणि रोझ व्हॅली चिट फंड घोटाळ्यांच्या तपासाकरिता कोलकात्याच्या पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी आले असताना स्थानिक पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. या प्रकरणी ममता बॅनर्जी यांनी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची पाठराखण करत त्यांच्यासाठी रविवारी (३ फेब्रुवारी) धरणे आंदोलनाला सुरुवात केली. राजीव कुमारदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते.
सर्वोच्च न्यायालयात ५ फेब्रुवारी रोजी सीबीआय विरुद्ध कोलकाता स्थानिक पोलीस यांच्यातील वादावर सुनावणी झाली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत बोलताना ममता बनर्जी म्हणाल्या कि, “आमच्याकरिता सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान नमूद केलेले मुद्दे हा नैतिक विजय असून आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचे पालन करू”. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय स्वागतार्ह असून यामुळे अधिकारी वर्गाचे मनोबल उंचावेल”, असा विश्वास देखील ममता बॅनर्जींनी व्यक्त केला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.