लखनऊ | उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी पहिल्यांदाच आज (११ फेब्रुवारी) राजकीय दौरा आहे. प्रियांका गांधींच्या हा दौऱ्यामुळे उत्तर प्रदेशातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सर्वत्र पोस्टर लावले आहे. या पोस्टरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियांका गांधींना दुर्गाच्या अवतारामध्ये दाखविले आहे. तसेच लखनऊमध्ये आज काँग्रेसने प्रियांकाचे भव्य स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी केले चित्र दिसत आहे. प्रियांका गांधी यांचा आज रोड शोही आयोजिण्यात आला आहे. या रोड शोमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राज्याच्या पश्चिम भागाची जबाबदारी असलेले काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे देखील सहभागी होणार आहेत.
Banner seen in Lucknow ahead of Congress General Secretary for UP East Priyanka Gandhi Vadra, UP West Jyotiraditya Scindia and party President Rahul Gandhi's visit to the city today. pic.twitter.com/i7Fojhb49m
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 11, 2019
या पोस्टरमध्ये प्रियांका गांधी यांना वाघावर स्वार झालेल्या दुर्गेच्या अवतारात दाखविण्यात आले असून “माँ दुर्गेचे रूप असलेले भगिनी प्रियांकाजी यांचे स्वागत आहे,” असे या पोस्टरवर कार्यकर्त्यांनी लिहिण्यात आले आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये युवक काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर पांडेय यांनी एक बॅनर लावला असून यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची छायाचित्रे आहेत. तसेच एक गट त्यांना सोडून जात असून, हे तिघेही एकटे पडल्याचे त्यात दर्शवले आहे. पोस्टर वर ‘ना बाबा ना, बहुत हो गया’ अशा वाक्यांचा उल्लेख करून मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे.
Lucknow: Latest visuals from Congress office. General Secretary for Uttar Pradesh East Priyanka Gandhi Vadra, General secretary for Uttar Pradesh West Jyotiraditya Scindia and party President Rahul Gandhi are visiting the city today. pic.twitter.com/zwfUn5VJTq
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 11, 2019
पोस्टरवर ”ना बाबा ना, बहुत हो गया और अब लौं नसानि अब ना नसिहों” अशा वाक्यांचा उल्लेख करत मोदींची खिल्ली उडवण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, हे तिन्ही नेते लखनऊच्या काँग्रेस मुख्यालयात जाऊन प्रियांका महात्मा गांधींच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करतील. राहुल गांधी सोमवारीच दिल्लीला परतण्याची शक्यता असून, प्रियंकाचा दौरा मात्र चार दिवसांचा आहे.लखनऊमध्ये प्रियांका गांधी व ज्योतिरादित्य सिंधिया १२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत काँग्रेस मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करतील.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.