HW Marathi
राजकारण

प्रियांका गांधी दिल्लीत जीन्स-टॉप, तर राजकीय दौऱ्यावर साडी नेसतात

नवी दिल्ली | प्रियांका गांधी वाड्रा यांच्‍या राजकीय प्रवेश केल्यानंतर अनेक भाजप नेते मंडळींनी आपल्या तोडले अकलेचे तारे आहेत. यात आता अजून एका भाजप खासदाराची भर पडली आहे. भाजपचे उत्तर प्रदेशमधील खासदार हरीश द्विवेदी यांनी प्रियांकांवर वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केले. द्विवेदी यांनी प्रियांकांच्‍या पोषाखावर टीका केली आहे. द्विवेदी यांनी उत्तर प्रदेशातील बस्ती येथील एका कार्यक्रमात  म्हटले की, “प्रियांका दिल्‍लीत असतात तेव्‍हा जीन्‍स आणि टॉप घालतात. त्या जेव्‍हा राजकीय दौर्‍यावर असतात त्‍यावेळी प्रियांका साडी नेसतात आणि कुंकू लावतात.”

याआधी “काँग्रेसकडे चेहरा नाही म्हणूनच आता काँग्रेस चॉकलेटी चेहरे समोर आणत आहे. कधी सलमान खान तर कधी करीना कपूर काँग्रेसकडून निवडणुक लढणार असल्याच्या बातम्या रंगत आहेत. आता तर प्रियंका गांधींना राजकारणात आणण्यात आले आहे” असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी देखील म्हटले होते.

 

Related posts

बेस्ट कर्मचाऱ्यांची माथी भडकवण्याचे काम शशांक राव यांनी केले !

News Desk

गोव्याने आपला ‘चौकीदार’ गमावला, देशातून सचोटीचे प्रयाण झाले !

News Desk

तिहेरी तलाकच्या नव्या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा

News Desk