HW News Marathi
देश / विदेश

रॉबर्ट वाड्रा यांची उद्या पुन्हा चौकशी

नवी दिल्ली | मनी लाँडरिंग प्रकरणी चौकशीसाठी अखेर रॉबर्ट वाड्रा हे आज (६ फेब्रुवारी) अंमलबजावणी संचालनाय (ईडी)च्या कार्यालयात हजर झाले आहे. ईडीने वाड्रा यांची तब्बल ४ तासांच्या आजच्या दिवसाची चौकशीनंतर पूर्ण झाली असून उद्या (७ फेब्रुवारी ) पुन्हा एकदा ईडीच्या चौकशीला समारे जावले लागणार आहे.

ईडीच्या चौकशी दरम्यान वाड्रा यांना लंडन मधील संपत्ती माझी नाही असे म्हटले, तर ईडीने संजय भंडारी बद्दल विचारल्यानंतर मी त्यांना ओळखत नसल्याचे वाड्रा यांनी सांगितले. ईडी अधिकारी वाड्रा यांना केलेले सर्व आरोप फेटाळल्यानंतर त्यांना भंडारी आणि त्यांच्यामधील मेल दाखविण्यात आले. ते दाखवून देखील वाड्रा यांनी ईडीचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे.

रॉबर्ट वाड्रा हे काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई असून पूर्व उत्तर प्रदेशाच्या महासिचव प्रियांका गांधी यांचे पती आहेत. तसेच वाड्रा हे दुपारी दुपारी ३ वाजून ४७ मिनिटांनी सुमारास ईडीच्या कार्यालयात वकिलांसोबत दाखल झाले आहे. पहिल्यांदाच वाड्रा ईडीसमोर हजर झाले आहे.

नेमके काय आहे प्रकरण

रॉबर्ट वाड्रा यांचे निकटवर्तीय सुनील अरोडांविरोधात मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल केला आहे. सुनील अरोडा यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. या प्रकरणी अरोडा यांच्या अटकेला १६ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती मिळाली आहे. लंडनच्या १२ ब्रायनस्टन स्क्वेअरमधील सुमारे १९ लाख पाऊंड (सुमारे १७ कोटी रुपये) एका मालमत्ता खरेदीशी संबंधीत हे मनी लॉडरिंगचे प्रकरण आहे. या संपत्तीचे मालक रॉबर्ट वाड्रा असल्याचा ईडीचा आरोप आहे. लंडनमधील सदनिका फरारी संरक्षण दलाल संजय भंडारीने १६ कोटी ८० लाख रुपयांना खरेदी केली होती. दुरुस्तीसाठी ६५,९०० पौंड एवढा खर्च करून भंडारीने २०१० मध्ये त्याच किंमतीत त्यांची विक्री वड्रा यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या फर्म केल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले. भंडारी विरोधात ऑफिशिएल सिक्रेट कायद्यांतर्गत २०१६ मध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधानांनी मराठीत केलं ट्विट, मोदींनी दिले महाराष्ट्र सरकारला सहकार्याचं आश्वासन

News Desk

इस्रोच्या G SAT-29 या संचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

News Desk

काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ

News Desk