HW News Marathi
देश / विदेश

पश्चिम बंगाल व्यतिरिक्त ‘या’ राज्यांत सीबीआयला बंदी

कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये सीबीआय आणि कोलकाता पोलीस यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्याचे चित्र सध्या दिसत आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी काल (३ फेब्रुवारी) ताब्यात घेतले आहे.

यानंतर भाजप-तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झाडल्या आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ममता यांनी पश्चिम बंगालमध्ये सीबीआयला प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकार हे सीबीआय आणि इतर तपास यंत्रणांचा वापर स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी करत असल्याचा आरोप ममता यांनी केला होता. त्यामुळे सीबीआयला राज्यात येऊन चौकशी करायची असल्यास, त्यांनी त्यासाठी परवानगी घ्यावी, असा आदेश बॅनर्जी यांनी दिला.

या’ राज्या सीबीआयला प्रवेश बंदी

पश्चिम बंगालच्या आधी आंध्र प्रदेश सरकारने सीबीआयला राज्यात प्रवेश बंदी केली आहे. आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या या निर्णयाचे ममता बॅनर्जी यांनी समर्थन केले होते. त्यानंतरही ममता यांनीही सीबीआयला राज्यात बंदी घालण्याचा निर्णय घेतला. गेल्याच महिन्यात छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारनं सीबीआयच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंतिम वर्षाच्या परीक्षा तर होणारच, सुप्रीम कोर्टाचा निर्णय !

News Desk

“गडकरींसारखा एखादा नेता शिवसेनेतही हवा होता”, बाळासाहेब ठाकरेंना गडकरींची भूरळ का पडली?

News Desk

वंदे भारत एक्सप्रेसमुळे धार्मिक केंद्रांशी जोडण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Aprna